Kojagiri Purnima Wishes In Marathi: कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

By
On:

Kojagiri Purnima Wishes Marathi 2024: शरद पौर्णिमा, ज्याला कोजागिरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असेही म्हणतात, आश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री साजरी केली जाते. हा महत्त्वाचा हिंदू सण, पावसाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक असून धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. यंदा, द्रिक पंचांगानुसार, शरद पौर्णिमा १६ ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या पवित्र दिवशी, राधा-कृष्ण, शिव-पार्वती आणि लक्ष्मी-नारायण यांसारख्या दैवी जोडप्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते.

कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी येथे आम्ही कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा, स्टेटस, संदेश दिलेले आहेत ते तुम्ही WhatsApp, Sharechat, Facebook, Instagram आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Kojagiri Purnima Wishes In Marathi (कोजागिरी पौर्णिमा संदेश २०२४)

१. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्या
संपूर्ण परिवाराकडून आपणांस
मनःपूर्वक शुभेच्छा

२. प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Status In Marathi (कोजागिरी पौर्णिमा २०२४)

३. शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

४. कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य,
मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Quotes In Marathi (कोजागिरी पौर्णिमा मराठी कोटस)

५. कोजागिरीची रात्री लखलखते,
दुधात देखण्या चंद्राचे रूप दिसते….
अशा या शरद पौर्णिमेला तुमची
आमची साथ लाभते….
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

६. कोजागिरी चे जागरण हे
जीवनातील सकारात्मकेचे,
सौम्यतेचे, सौदर्यानुभवाचे,
सजगेचे कारण आणि हिच
या उत्सवाची सार्थकता…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha In Marathi

७. कोजागिरीच्या चांदण्या रात्री,
पूर्ण चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात,
केशरबदाम मिश्रित आटीव
दुधाचा आस्वाद घेणे…
म्हणजे खरे सुख…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

८. चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात
ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेटस (Kojagiri Purnima Shubhechha In Marathi)

९. हा चंद्र तुझ्यासाठी,
ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. कोजागिरीची आज रात,
पूर्ण चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची वरात,
चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

For Feedback - feedback@speaks.co.in

Leave a Comment